*कोंकण एक्सप्रेस*
*गोवा सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचा दहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा*
*दोडामार्ग : शुभम गवस*
गोवा सिंधुदुर्ग न्यूज या डिजिटल वृत्तवाहिनीचा दहावा वर्धापनदिन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारिता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सिंधुदुर्ग आपलं न्यूजचे संपादक शिरीष नाईक यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी पत्रकारितेची समाजातील भूमिका अधोरेखित करत, समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी असून लोकशाही बळकट करण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना संपादक शिरीष नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. हा सन्मान पत्रकारितेतील जबाबदारी अधिक वाढविणारा असून भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपसभापती गणेशप्रसाद गावस, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गवस, प्राध्यापक संदीप गावस, उद्योजक बाबा टोपले, नार्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

