सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा; महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा; महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व तयारीचा पालकमंत्री नितेश राणेंकडून आढावा; महावितरणला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना*

*मुंबई, दि. ०२ जून* 

सिंधुदुर्ग मंडळांतर्गत विद्युत उपकरणांची देखभाल, दुरुस्ती तसेच विविध प्रलंबित अडचणींच्या अनुषंगाने मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस आमदार दीपक केसरकर, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाळ्याच्या काळात वीजपुरवठा कमीत कमी खंडित होईल, यासाठी महावितरणने आवश्यक ती दक्षता घेऊन प्रभावी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांचे दूरध्वनी स्वीकारून त्यांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, नागरिकांशी समन्वय राखावा आणि सेवा अधिक परिणामकारकपणे द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दुरुस्ती व देखभाल कामांचे नियोजन करताना पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!