विलास कांबळे यांचे निधन

विलास कांबळे यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*विलास कांबळे यांचे निधन*

*कणकवली : प्रतिनिधि*

कणकवली – सिद्धार्थनगर येथील विलास महादेव कांबळे (४७) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. विलास हे फरशी बसविण्याचे व पॉलिश करण्याचे काम करत असत. ते शांतिदूत कला – क्रीडा मंडळ कणकवलीचे संस्थापक उपाध्यक्ष देखील होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. ते सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी दीपक कांबळे यांचे सख्खे बंधू तर सामाजिक कार्यकर्ते तथा सत्यशोधक संघटनेचे नेते ऍड. सुदीप कांबळे यांचे चुलत बंधू होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!