*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित ‘सिंधुगर्जना चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न*
*‘सिंधुगर्जना चषक २०२६’चा मानकरी ठरला ‘अनुरी वॉरियर्स’ संघ*
*‘ओम साई स्पोर्ट्स’ संघ उपविजेता*
*कणकवली : प्रतिनिधि*
एन. बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित ‘सिंधुगर्जना चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अनुजा ऋषिकेश भिसे यांच्या ‘अनुरी वॉरियर्स’ संघाने आदित्य घाडीगावकर याच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत ‘सिंधुगर्जना चषक २०२६’ वर आपले नाव कोरले. तर तनोज मालंडकर यांच्या ‘ओम साई स्पोर्ट्स’ संघाने ओंकार भोगले याच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा ब्राम्हणदेव मंदिर, कनकनगर येथील मैदानावर रंगली. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील सर्व खेळाडू सिंधुगर्जना पथकातील वादक होते. प्रत्येक संघामध्ये मुलींचाही सहभाग असल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली होती.
स्पर्धेत सहभागी संघांमध्ये रामेश्वर सुपर स्ट्रायकर्स (संघमालक – कृष्णराज सातवसे), कनकस्टार (कल्पेश महाडेश्वर), स्वयंभू रवळनाथ (जोगेश राणे), ओम साई स्पोर्ट्स (तनोज मालंडकर), अनुरी वॉरियर्स (अनुजा भिसे) आणि डी. एस. स्वराज (सुमंगल सावंत) या संघांचा समावेश होता. आयपीएलच्या धर्तीवर लिलाव प्रक्रियेद्वारे खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेचा अंतिम सामना ‘अनुरी वॉरियर्स’ आणि ‘ओम साई स्पोर्ट्स’ यांच्यात रंगला. एकूण १० रंगतदार सामन्यांनंतर ‘अनुरी वॉरियर्स’ संघ सरस ठरला.
संघनायक आदित्य घाडीगावकर याला ‘मालिकावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मुलांच्या गटात उत्कृष्ट फलंदाज म्हणून धनंजय सावंत आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ऋषिकेश घाडीगावकर यांना सन्मानित करण्यात आले. मुलींच्या गटात उत्कृष्ट फलंदाज रिदा मन्सुरी तर उत्कृष्ट गोलंदाज दिव्या कुऱ्हाडे यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. युवराज महालिंगे यांच्या हस्ते, सिंधुगर्जनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हरीभाऊ भिसे , कार्याध्यक्ष सर्वेश भिसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी कणकवलीतील प्रतिष्ठित उद्योजक आणि समाजसेवक श्री. दीपक बेलवलकर, कार्याध्यक्ष सर्वेश भिसे, तनोज मालंडकर, श्री. कल्पेश महाडेश्वर, श्री. जोगेश राणे, श्री. कृष्णराज सातवसे, तसेच अनुजा ऋषिकेश भिसे यांच्या ‘अनुरी वॉरियर्स स्पोर्ट्स’ संघातर्फे तन्मय सरूडकर,पथकप्रमुख नितीन चव्हाण, उपप्रमुख प्रज्ञेश निग्रे, महिला प्रमुख मिनल साबळे, उपप्रमुख दिव्या कुऱ्हाडे, रोहित म्हापसेकर, तुषार म्हापसेकर, वैभव म्हापसेकर, नरेंद्रप्रसाद भोगले आणि हर्षद पारकर तसेच पथकातील सर्व पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व वादक व खेळाडूंचे कौतुक केले. सिंधुगर्जना पथक गेली सहा वर्षे वाद्यवादनातून आपली कला जोपासत विविध क्रीडा,सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य करत आहे.

