आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची केली पाहाणी

आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची केली पाहाणी

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाची केली पाहाणी…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिमखाना मैदान येथील क्रीडा संकुलाच्या कामाचा पाहाणी केली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेंसह क्रीडा अधिकारी यावेळी उपस्थित होते. परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभं करणारं असल्याचा विश्वास यावेळी श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, परिपूर्ण असं क्रीडा संकुल उभ करत इन डोअरसह आऊट डोअर क्रीडा प्रकारही इथे उपलब्ध असणार आहेत. मुलांमध्ये क्रीडा प्रकारांची आवड निर्माण होण्यासाठी न.प. च्या सहकार्यातून प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी क्रीडा अधिकाऱ्यांकडून श्री. केसरकर यांनी कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता पूजा इंगवले, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, न.प. चे सार्वजनिक बांधकाम अभियंता तुषार सरडे, उप अभियंता सीमा गोवेकर, अर्चित पोकळे, प्रसाद नार्वेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!