*कोंकण एक्सप्रेस*
*त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे इयत्ता दहावी उज्वल निकालाची परंपरा कायम 100% निकाल*
*कणकवली ः संजना हळदिवे*
*त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता.मालवण या शाळेचा इयत्ता दहावी निकाल १००टक्के लागला असून एकूण २२विद्यार्थ्यांपैकी ११विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले असून ११विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत. अनेक वर्षांपासूनची१००टक्के निकालाची परंपरा या प्रशालेने कायम राखली आहे.कु.स्नेहल सोनू गांवकर ८८.८०टक्के गुणांसह प्रथम,कु.विशाका विवेक पारकर ८७.६० गुणांसह द्वितीय तर कु.श्रृती अजित घाडीगांवकर हिने ८५.२० गुणासह तृतीय क्रमांक प्राप्त केला.यशस्वी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर पालक यांचे संस्था अध्यक्ष श्री.बाबू बाणे, उपाध्यक्ष श्री.अच्युत भावे, कार्याध्यक्ष श्री.शंकर घाडीगांवकर, सरचिटणीस श्री.तुषार राऊत, सहसचिव श्री.विजय घाडीगांवकर , खजिनदार श्री भाऊराव घाडीगांवकर,सह सचिव श्री.अशोक भावे, शालेय समिती अध्यक्ष श्री.दशरथ घाडीगांवकर, शालेय समिती माजी अध्यक्ष श्री.सहदेव चव्हाण, सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य,मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी अभिनंदन केले.

