*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ला तालुक्याचा दहावीचा निकाल 98.51 टक्के*
*राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची कन्या नुपूर गावडे वेंगुर्ला तालुक्यात प्रथम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 672 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 662 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 98.51 टक्के लागला. मदर तेरेसा स्कूलची विद्यार्थीनी तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची कन्या नुपूर गावडे हिने 98 टक्के गुण मिळवित वेंगुर्ला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. तर तालुक्यातील एकूण 19 शाळांपैकी 14 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
जाहिर झालेल्या निकालामध्ये मदर तेरेसाची विद्यार्थीनी कस्तुरी तुळसकर आणि परूळे येथील अण्णसाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थीनी अवंतिका देसाई हिने 97.80 टक्के गुण मिळवित द्वितीय, श्री सातेरी हायस्कूल वेतोरेच्या नित्या सावंत हिने 97.40 टक्के गुण मिळवित तृतीय, तसेच शिरोडा येथील गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या आरूषी जाधव हिने 96.80 टक्के गुण मिळवित चतुर्थ तर याच विद्यालयाच्या निधी सारंग हिने 96.60 टक्के गुण मिळवित पाचवा क्रमांक पटकाविला.
तालुक्यातील शाळांचा निकाल व टक्केवारीनुसार अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे –
मठ येथील रा.धों.खानोलकर हायस्कूलमधून बसलेले एकूण 13 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. हायस्कूलमध्ये प्रथम-वसंत ठाकूर (85.08 टक्के), द्वितीय-प्रज्वल धुरी (80 टक्के), तृतीय-सोहम परब (74.04 टक्के).
न्यू इंग्लिश स्कूल मातोंड मधून बसलेले 27 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. स्कूलमध्ये प्रथम-दिक्षिता मातोंडकर (93.40 टक्के), द्वितीय-साक्षी केणी (91 टक्के), तृतीय-मंथन परब (89.90 टक्के).
श्री सरस्वती विद्यालय, आरवली-टांकमधून बसलेले 17 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. विद्यालयातून प्रथम-ऋतुज गोडकर (90 टक्के), द्वितीय-स्नेहल भुबे (85.80 टक्के), तृतीय-मिनल तांडेल (79.20 टक्के).
अणसूर-पाल हायस्कूलमधून बसलेले 19 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-श्रीयश मालवणकर (91 टक्के), द्वितीय-वेदांत गावडे (88.20 टक्के), तृतीय-खुशी मालवणकर (86.80 टक्के).
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलमधून बसलेले 30 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. स्कूलमध्ये प्रथम-सिद्धी गावडे (95.20 टक्के), द्वितीय-श्रावणी पवार (90.80 टक्के), तृतीय-पूर्वा कावले (89 टक्के).
कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेलमधून बसलेले 28ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-अर्पिता धर्णे (94.40 टक्के), द्वितीय-श्रावणी धर्णे (93.20 टक्के), तृतीय – प्रतिक्षा धुरी (92.80 टक्के).
न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथून बसलेले 41 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. स्कूलमधून प्रथम-वैभवी चिपकर (89 टक्के), द्वितीय-सेजल रेडकर (87.60 टक्के), तृतीय-सोहम टेमकर (87.40 टक्के).
अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परूळे येथून बसलेले 53 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. विद्यामंदिरातून प्रथम-अवंतिका देसाई (97.80 टक्के), द्वितीय-विशाखा पंचलींग, तृतीय-श्रृती राणे (92.80 टक्के).
माऊली विद्यामंदिर, रेडीमधून बसलेले 15 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. विद्यामंदिरातून प्रथम-साईशा कांबळी (92.80 टक्के), द्वितीय-रिया मांजरेकर (87.20 टक्के), तृतीय-सत्यम राणे (83.40 टक्के)
आसोली हायस्कूलमधून बसलेले 11 ही विद्यार्थी उत्तीण होऊन निकाल 100 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-श्रेया गावडे (91 टक्के), द्वितीय-सृष्टी गावडे (89.40 टक्के), तृतीय-मिताली गावडे (84.80 टक्के).
स.का.पाटील विद्यामंदिर केळुसमधून बसलेले 26ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. विद्यामंदिरमधून प्रथम-धीरज शेटये (96 टक्के), द्वितीय – साईल धुरी (92 टक्के), तृतीय-समता परब (90.20 टक्के).
मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूलमधून बसलेले 53 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. स्कूलमधून प्रथम-नुपूर गावडे (98 टक्के), द्वितीय-कस्तुरी तुळसकर (97.80 टक्के), तृतीय-ऋषिका नेरूरकर (95.40 टक्के).
वेंगुर्ला हायस्कूलमधून बसलेले 89ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-गिरीजा चव्हाण (94.80 टक्के), द्वितीय – रामकृष्ण गावडे (94.40 टक्के), तृतीय-श्रावणी सूर्यवंशी (93.80 टक्के)
मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडीमधून बसलेले 19 ही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला. विद्यालयामधून प्रथम-कांचन शेटकर (91.20 टक्के), द्वितीय-श्रीधर चोपडेकर (88.40 टक्के), तृतीय-सान्वी तांडेल (86.80 टक्के).
श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेमधून बसलेले 79 पैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 97.46 टक्के लागला. हायस्कूलमध्ये प्रथम-नित्या सावंत (97.40 टक्के), द्वितीय-सार्थक जामदार (96.20 टक्के), तृतीय-प्रतिक माधव (93 टक्के).
रा.कृ.पाटकर हायस्कूलमधून बसलेल्या 33 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 93.93 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-दुर्वा गांवकर (93.20 टक्के), द्वितीय-रिशिता बोवलेकर (85.60 टक्के), तृतीय-वैष्णवी पडवळ (84.20 टक्के).
गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय, शिरोडामधून बसलेले 86 पैकी 84 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 95.34 टक्के लागला. विद्यालयातून प्रथम-आरूषी जाधव (96.80 टक्के), द्वितीय-निधी सारंग (96.60 टक्के), तृतीय-रूद्राणि दिक्षित (95 टक्के).
दाभोली इंग्लिश स्कूलमधून बसलेले 18 पैकी 17 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 94.44 टक्के लागला. स्कूलमधून प्रथम-समिधा पवार (88.80 टक्के), द्वितीय-अंतरा दाभोलकर (85.20 टक्के), तृतीय-पल्लवी प्रभूदेसाई (84.40 टक्के).
श्री शिवाजी हायस्कूल तुळसमधून बसलेले 21 पैकी 20 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 95.23 टक्के लागला. हायस्कूलमधून प्रथम-प्रतिक परब (87.40 टक्के), द्वितीय-संस्कृती तुळसकर (86.60 टक्के), तृतीय-धनराज पायनाईक (74 टक्के).
फोटो – 1) नुपूर गावडे, 2) कस्तुरी तुळसकर व अवंतिका देसाई 3) नित्या सावंत, 4) आरूषी जाधव, 5) निधी सारंग
वेंगुर्ला तालुका शाळा निहाय निकाल
1) रा.धों.खानोलकर हायस्कूल, मठ – 13 पैकी 13 उत्तीर्ण – 100 टक्के
2) वेंगुर्ला हायस्कूल – 89 पैकी 89 उत्तीर्ण – 100 टक्के
3) सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल-30 पैकी 30 उत्तीर्ण – 100 टक्के
4) मदर तेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल – 53 पैकी 53 उत्तीर्ण – 100 टक्के
5) न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा – 41 पैकी 41 उत्तीर्ण – 100 टक्के
6) कृषीरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल, आडेली-28 पैकी 28-100 टक्के
7) अणसूर-पाल हायस्कूल – 19 पैकी 19 उत्तीर्ण – 100 टक्के
8) न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड – 27 पैकी 27 उत्तीर्ण – 100 टक्के
9) आसोली हायस्कूल, आसोली – 11 पैकी 11 उत्तीर्ण – 100 टक्के
10) मातोश्री पार्वती राऊत विद्यालय, रेडी – 19 पैकी 19 उत्तीर्ण – 100 टक्के
11) श्री माऊली विद्यामंदिर, रेडी – 15 पैकी 15 उत्तीर्ण – 100 टक्के
12) सरस्वती विद्यालय, आरवली – 17 पैकी 17 उत्तीर्ण – 100 टक्के
13) स.का.पाटील विद्यामंदिर, केळूस – 26 पैकी 26 उत्तीर्ण – 100 टक्के
14) अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर, परूळे – 53 पैकी 53 उत्तीर्ण – 100 टक्के
15) रा.कृ.पाटकर हायस्कूल – 33 पैकी 31 – उत्तीर्ण – 93.93 टक्के
16) दाभोली इंग्लिश स्कूल – 18 पैकी 17 – 94.44 टक्के
17) श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे – 79 पैकी 77 उत्तीर्ण – 97.46
18) श्री शिवाजी हायस्कूल, तुळस – 21 पैकी 20 उत्तीर्ण – 95.23 टक्के
19) अ.वि.बावडेकर विद्यालय, शिरोडा – 83 पैकी 82 उत्तीर्ण – 95.34 टक्के

