*कोंकण एक्सप्रेस*
*रक्तदान शिबिरात 51 दात्यांचे रक्तदान*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला येथील श्री सातेरी देवीच्या मळलेपन आणि शतचंडी महायाग अनुष्ठानाच्या सांगतेनिमित्त सातेरी देवस्थानतर्फे 27 एप्रिल रोजी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात सुमारे 51 दात्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
शिबिराचे उद्घाटन सातेरी देवस्थानचे अध्यक्ष सुनिल परब, कार्याध्यक्ष दाजी परब, सचिव दत्तप्रसाद परब, खजिनदार सहदेव परब, श्री रामेश्वर देवस्थानचे सचिव रवी परब, नगरसेवक आकांक्षा परब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरासाठी जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

