मठ ग्रामपंचायत सदस्यपदी

मठ ग्रामपंचायत सदस्यपदी

*कोंकण एक्सप्रेस*

*मठ ग्रामपंचायत सदस्यपदी*

*गाव विकास पॅनल च्या दर्शना नाईक विजयी*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. 3 मधील रिक्त जागेसाठी ( सर्वसाधारण महिला ) मंगळवार 28 एप्रिल रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मठ नं. 2 परबवाडा या केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न झाली होती.आज बुधवारी तहसील कार्यालय येथे झालेल्या मतमोजणीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या 236 मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपच्या सुप्रिया सुशांत गावडे (197 मते ) पराभूत झाल्या. नोटासाठी 11 इतके मतदान झाले. यावेळी उभादांडा जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मठ माजी उपसरपंच नित्यानंद शेणई, ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत, अरविंद बागायतकर, स्वप्नील गडेकर, समीर नाईक, सौ. नाईक तसेच मठ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!