*सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात सुरक्षा बळकट : शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन*

*सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात सुरक्षा बळकट : शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन*

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात सुरक्षा बळकट : शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन*

 *सिंधुदुर्गनगरी, दि. ०१ (जि.मा.का) :*

सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भर घालत, शस्त्रसाठा सुरक्षित व कार्यक्षम ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या शस्त्रागार गार्डरुमचे उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा कारागृहाच्या बाहेरील परिसरात उभारण्यात आलेले हे शस्त्रागार गार्डरुम आधुनिक सुरक्षाव्यवस्थांनी सुसज्ज असून, ते २४ तास कडक निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कारागृह परिसरातील शस्त्रसाठ्याचे सुरक्षित व्यवस्थापन सुलभ होणार असून, बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने गस्त वाढविण्यास मोठी मदत होणार आहे.

विशेषतः कारागृहाच्या बाहेरील बाजूस सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी ही गार्डरुम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे कारागृहाच्या एकूण सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून, आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सुरक्षिततेचा दर्जा उंचावला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!