झोळंबे शाळेचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक; परसबाग स्पर्धेत दिमाखदार यश

झोळंबे शाळेचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक; परसबाग स्पर्धेत दिमाखदार यश

*कोंकण एक्सप्रेस*

*झोळंबे शाळेचा जिल्ह्यात तृतीय क्रमांक; परसबाग स्पर्धेत दिमाखदार यश..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात झोळंबे येथील जिल्हा परिषद शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत आयोजित परसबाग स्पर्धेत झोळंबे शाळेने जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकावत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या यशाबद्दल शाळेचा शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते शाळेचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाळा व ग्रामस्थांच्या वतीने अध्यक्ष दिपक गवस यांनी सन्मान स्वीकारला. तसेच गटशिक्षणाधिकारी श्री. नदाफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या यशामागे विद्यार्थ्यांचे परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले. झोळंबे शाळेच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशीच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!