*कोंकण एक्सप्रेस*
*भाजप प्रदेश प्रवक्तेपदी माजी आमदार प्रमोद जठार यांची नियुक्ती; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची घोषणा*
*मुंबई:*
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आज नवीन संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोकणातील आक्रमक नेतृत्व आणि माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांची ‘प्रदेश प्रवक्ते’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही घोषणा केली असून, एकूण २३ जणांची प्रदेश प्रवक्ते म्हणून वर्णी लागली आहे. पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
प्रमुख नियुक्त्या खालीलप्रमाणे:
प्रमोद जठार यांच्यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या नेत्यांनाही या जबाबदारीत स्थान मिळाले आहे:
श्री. विश्वास पाठक
श्री. प्रमोद जठार
श्री. अजित चव्हाण
श्री. अवधूत वाघ
श्रीमती श्वेता शालिनी
श्री. कुणाल टिळक
श्री. विनायक आंबेकर
श्रीमती शिवानी दाणी
(आणि इतर एकूण २३ पदाधिकारी)
या निवडीनंतर प्रमोद जठार यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्व नवनियुक्त प्रवक्त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

