*आरवली वेतोबा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*

*आरवली वेतोबा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*

*कोंकण एक्सप्रेस*

*आरवली वेतोबा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वर्धापनदिन सोहळा 21 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त 19 ते 23 एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दि.19 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री 8 वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ 8.30 वा. नाईक मोचेमाडकर दशावतारी मंडळाचे नाटक, दि.20 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, सायं. 5 वा. कै.लालजी देसाई संगीत विद्यालय आयोजित “अभंग गीत गायन स्पर्धा’ रात्री 8 वा. पालखी प्रदक्षिणा, दि.21 रोज सकाळी 8 वाजल्यापासून लघुरूद्र, अभिषेक, पुर्णाहूती, बलिदान, दुपारी 1 वा. महाआरती व महाप्रसाद, रात्री 10 वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ 10.30 वा. राज्यस्तरीय नाट¬ स्पर्धेत क्रमांक प्राप्त कलावलय वेंगुर्ला “अथांग’ हे दोन अंकी नाटक, दि.22 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, रात्री 8 वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ 8.30 वा. “झी मराठी सारेगमप फेम’ लिटल चॅम्प कु. गार्गी सिद्धये (गोवा-फोंडा) हिची अभंग, भक्तीगीत, भावगीत व नाट¬गीतांची सुरेल मैफल, दि.23 रोजी रात्री 8 वा. पालखी प्रदक्षिणा, रात्रौ 9 वा. रामे·ार दशावतार नाट¬ मंडळ, वेंगुर्ला यांचा “रूक्मिणी स्वयंवर’ हा नाट¬प्रयोग होणार आहे.

तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, महाप्रसादाचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीतर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!