*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ल्यात उद्या स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्रातील नगरपरिषदा / नगरपंचायतींचे लोकप्रतिनिधी व अधिकारी / कर्मचारी यांच्या स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. या क्रीडा स्पर्धा 18 व 19 एप्रिल रोजी मेजर ध्यानचंद्र क्रीडांगण, कॅम्प-वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग नगरविकास शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेवेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

