*कोंकण एक्सप्रेस*
*वेधक खोचरे, पूर्वा खरात प्रथम*
*रामरक्षा स्त्रोत, रंग, वेशभूषा स्पर्धेचा निकाल जाहीर*
*कणकवली ः संजना हळदिवे*
रामनवमीनिमित्त कलमठ बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे मंदिरात आयोजित केलेल्या रामरक्षा स्त्रोत स्पर्धेत वेधक खोचरे याने तर रंगभूषा, वेशभूषा स्पर्धेत पूर्वा खरात हिने प्रथम क्रमांक पटकाविला.
रामरक्षा स्त्रोत स्पर्धा : पावनी पित्रे द्वितीय तर ऋग्वेद घाटे तृतीय क्रमांक पटकाविला. रंगभूषा स्पर्धा : चैतन्य कांबळी द्वितीय तर नीरज तहसीलदार याने तृतीय क्रमांक पटकाविला. स्पर्धांचे परीक्षक म्हणून नंदकुमार हजारे, नीलेश महेंद्रकर, विनायक उर्फ बंडू घाटे यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पडल्यानंतर विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. समितीचे अध्यक्ष राजाराम (बंडू) दंताळ यावेळी विजय उर्फ नाना कांबळी, नंदकुमार हजारे, अनंत पालकर, विनोद कोरगावकर, आबा कोरगावकर, अनंत पालकर, महादेव उर्फ ढवण, शेकर पेंडुरकर, अजित काकडे, शेखर पेंडुरकर, तनोज कळसुकर, अण्णा मठकर, संतोष हजारे, संजय कडुलकर,निलेश महेंद्रकर, विनय खोचरे, वैशाली हजारे, पूजा हुन्नरे, उषा साखरे, छाया हजारे, श्रद्धा हजारे, सीमा कडुलकर, पद्यजा दंताळ, रंजिता तहसीलदार, प्रसाद मठकर, निश्चिय हुन्नरे आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नंदकुमार हजारे गुरुजी, तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, निश्चय हुन्नरे, प्रसाद मठकर, मंथन हजारे यांनी मेहनत घेतली.

