देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

*कोंकण एक्सप्रेस*

*देवरुख फिश मार्केटसाठी लवकरात लवकर जागा निश्चित करावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे*

*मुंबई, दि.२७ मार्च*

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवरुख नगरपंचायत कार्यक्षेत्रात फिश मार्केटसाठी योग्य जागा लवकरात लवकर निश्चित करून प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. तसेच लवकरच भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत देवगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मत्स्यबाजार (फिश मार्केट) विकसित करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, मुख्याधिकारी प्रशांत भोसले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दूरदृष्टय प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.

मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले की, फिश मार्केटचे नियोजन करताना स्थानिक नागरिक व मच्छी विक्रेत्यांच्या सोयीचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी आधुनिक बाजारपेठ उभारल्यानंतरही पारंपरिक ठिकाणे सोडून विक्रेते नव्या ठिकाणी जात नाहीत, त्यामुळे नवीन बाजारपेठेची जागा निवडताना लोकांची ये-जा आणि सवयी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासनाने जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नगरपरिषद पातळीवर समन्वय साधून जागा निश्चित करावी, तसेच इस्टिमेट, प्रस्ताव आणि तांत्रिक मान्यता प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक त्या सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असेही मंत्री श्री राणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!