केर-भेकुर्लीत सौं. सायली निंबाळकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

केर-भेकुर्लीत सौं. सायली निंबाळकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

*कोंकण एक्सप्रेस*

*केर-भेकुर्लीत सौं. सायली निंबाळकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद*

*दोडामार्ग: शुभम गवस*

कोनाळ पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सौं. सायली स्वप्निल निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला असून केर व भेकुर्ली गावात त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घराघरात भेट देत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व विकासकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
या प्रचारावेळी महायुतीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढता जनसंपर्क व मिळणारा प्रतिसाद पाहता मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!