*कोंकण एक्सप्रेस*
*सुवर्णसंधी: उद्या मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर*
*नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा*
*सिंधुदुर्गनगरी*
पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून उद्या दि. 08 ऑगस्ट रोजी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने या शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपलब्ध विशेष तज्ज्ञ सेवा :
* कार्डिओलॉजिस्ट
* कार्डिअॅक सर्जन
* न्यूरो सर्जन
* प्लास्टिक सर्जन
* ऑन्को सर्जन (कर्करोग तज्ज्ञ)
* युरो सर्जन
* जनरल सर्जन
* अस्थिरोग तज्ज्ञ
* नेत्ररोग तज्ज्ञ
* डेंटल सर्जन
* हृदयरोग व मधुमेहरोग तज्ज्ञ
* फुफ्फुसरोग तज्ज्ञ
* मानसोपचार तज्ज्ञ
* बालरोग तज्ज्ञ
* स्त्रीरोग तज्ज्ञ
मोफत तपासण्या :
* ब्लड प्रेशर तपासणी
* ब्लड शुगर तपासणी
* एक्स-रे
* सीटी स्कॅन
* सोनोग्राफी
* हृदयाची 2D इको तपासणी
* ईसीजी
* प्रयोगशाळा रक्त तपासणी
* शालेय मुलांची आरोग्य तपासणी
शिबिराच्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड व आभा (ABHA) कार्ड सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
स्थळ : बाह्यरुग्ण विभाग (OPD), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग
दिनांक : शनिवार, दि. 08 ऑगस्ट 2026
वेळ : सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

