*कोंकण एक्सप्रेस*
*शाळा वाचवा – शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग*
*२६ जानेवारी रोजीचे नियोजित लाक्षणिक उपोषण स्थगित*
*सिधुदुर्गनगरी*
शाळा वाचवा – शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिनांक २६ जानेवारी २६ रोजी नियोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषणाला स्थगिती देण्यात आली आहे.
मंचाने यापूर्वी २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, दिनांक ५ जानेवारी २० २६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान स्वतः आदरणीय पालकमंत्री उपस्थित राहिले. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे विचार व मागण्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या तसेच मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही, यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष प्रयत्न करणार असल्याचे जाहीरपणे सांगण्यात आले. पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या या सकारात्मक भूमिकेचा आणि आश्वासनाचा मान राखून, शाळा वाचवा – शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग यांनी २६ जानेवारी रोजीचे नियोजित लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय मंचाचे अध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर आणि सचिव श्री. महेश पाटोळे यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. भविष्यातील घडामोडींवर मंचाचे बारकाईने लक्ष राहील व गरज भासल्यास पुढील दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

