माटणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून रविकिरण गवस आघाडीवर..

माटणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून रविकिरण गवस आघाडीवर..

*कोंकण एक्सप्रेस*

*माटणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून रविकिरण गवस आघाडीवर..*

*दोडामार्ग.. शुभम गवस*

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. अल्प कालावधीत प्रभावी कामगिरी करत त्यांनी पक्षात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
गेल्या एका ते दीड वर्षात त्यांनी ५० पेक्षा अधिक आंदोलने करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. ते मूळचे खोक्रल गावचे असून पुणे येथे यशस्वी उद्योजक आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार मिशनच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
सध्या ते दोडामार्ग–माटणे मतदारसंघात २४x७ कार्यरत असून राष्ट्रवादी पक्षाची संघटना बळकट करत कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली आहे. नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर त्यांना माटणे मतदारसंघातून उमेदवारीसाठी हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी पक्षासाठी ही जागा निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!