*कोंकण एक्सप्रेस*
*तळेरे पंचक्रोशीतील हुरहुन्नरी व्यक्तीमत्व हरपले*
*कासार्डे : संजय भोसले*
तळेरे पंचक्रोशीतील नामवंत व्यक्तीमत्व , शिक्षक, मुख्याध्यापक,एल आय सी. एजंट अशा अनेक अंगानी परिचीत असलेले जी. भएल. तांबे सर यांचे आज पहाटे अल्पशा आजिराने दुःखद निधन झाले.
आदरणीय जी एल तांबे सर यांनी मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचा पाया घातला व मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेच्या माध्यमातून अनेकांना आपला न्याय हक्क मिळवून दिला .
सरांनी प्रसंगी स्वखर्चाने संघटनेचे कामकाज केले . त्यांच्या मागे चार मुलगे ,सुना,पत्नी,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली

