कणकवलीत भ्रष्टाचाराला जनता विसर्जन देणार

कणकवलीत भ्रष्टाचाराला जनता विसर्जन देणार

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवलीत भ्रष्टाचाराला जनता विसर्जन देणार*

*नागरिकांनी उभी केलेली शहर विकास आघाडी विजयी होणार*

*कणकवलीत परिवर्तनाची लाट*

*माजी आ. वैभव नाईक व परशुराम उपरकर यांचा प्रहार*

*कणकवली : संजना हळदिवे*

शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना कणकवली शहरातील नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संदेश पारकर आणि त्यांचे सर्व १७ नगरसेवक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

नाईक म्हणाले, कणकवलीत सध्या भ्रष्टाचारी राजवट सुरू असून नागरिक या राजवटीला यंदाच्या निवडणुकीत विसर्जन देतील. शहर विकास आघाडीला मिळणारा वाढता प्रतिसाद हा परिवर्तनाचा संकेत आहे.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही विरोधकांवर टीका करताना म्हटले की, शहर विकास आघाडी ही नागरिकांनी उभी केलेली शक्ती आहे. नागरिकांनी संदेश पारकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली असून सर्व उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख आहेत. विरोधकांनी भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली असून प्रभाग बदलून निवडणूक लढवण्याची पद्धत नागरिकांना अजिबात मान्य नाही.

जनतेमध्ये “दगडापेक्षा वीट मऊ” हे उदाहरण देत शहर विकास आघाडीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. नारळ हे शहर विकास आघाडीचे निवडणूक चिन्ह असल्याने सर्वजण नारळालाच बहुमान देतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे.

संदेश पारकर म्हणाले, ही माझी शेवटची निवडणूक आहे. येत्या पाच वर्षात कणकवलीचा चेहरामोहरा बदलून दाखवू. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मुलभूत सोयींसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आधीच ब्लूप्रिंट तयार केली आहे. भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा आमचा नारा असून जनतेतून मिळणारा प्रतिसाद हा मोठ्या परिवर्तनाचा संकेत आहे.

संदेश पारकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना आदी पक्षांनी शहर विकास आघाडीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विरोधी पक्षांच्या मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आम्ही सर्व मिळून लढत आहोत. जनतेतून दिसणारा उत्साह पाहता येणाऱ्या ३ डिसेंबरला शहर विकास आघाडी नगरपंचायतीत सत्ता स्थापन करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असेही पारकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!