डॉ.काकासाहेब यांच्या चिरंतन विचाराचा ठेवा आजही प्रेरणादायी

डॉ.काकासाहेब यांच्या चिरंतन विचाराचा ठेवा आजही प्रेरणादायी

*कोंकण एक्सप्रेस*

*डॉ.काकासाहेब यांच्या चिरंतन विचाराचा ठेवा आजही प्रेरणादायी*

*मालवण  : प्रतिनिधी*

*वाचा सविस्तर बातमी👇*

आज आपण शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहोत ही आमच्यासाठी भाग्याची बाब असून या शतक वर्षाचे आपण साक्षीदार असणार आहोत.याचे सर्व श्रेय डॉ.काकासाहेब वराडकर यांना असून काकासाहेबानी स्थापन केलेल्या या शाळेतून आज पर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी ज्ञान ग्रहण करून प्रत्येक क्षेत्रात नाव कमावले आहे.ही एक गौरवाची बाब असून आज ही डॉ.काकासाहेब यांचा चिरंतन ठेवा आमच्यासाठी प्रेरणादायी असून तो वसा आपण चालवत राहू असे आशादायी विचार कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी डॉ.काका साहेब वराडकर यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा च्या सिद्धी सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.या वेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणं बद्दल कौतुक करताना प्रशालेतील चाललेल्या उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त करताना संध्येच्या ध्येय धोरणाबद्दल ची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अन्यया पाटील ,कौस्तुभ गोसावी,सुगंधा वायगंणकर, संचिता करावडे,दर्श वराडकर या विद्यार्थ्यांनी डॉ.काकासाहेबांच्या बद्दल आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून उंब्राणी स्वामी शिवानंद इंग्रजी परीक्षा याचा निकाल घोषित करण्यात आला.तसेच डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय च्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार घालून झाली.या वेळी व्यासपीठावर स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर, सचिव श्री.सुनील नाईक,सचिव श्रीमती विजयश्री देसाई, संचालक श्री.महेश वाईरकर, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक पर्यवेक्षक श्री.महेश भाट उपस्थित होते.
सूत्रसंचालन संसद सहायक अधिपती श्री.चांदरकर समीर अशोक तर आभार श्री. किसन मारुती हडलगेकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (सं) कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा ,डॉ. दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा चे सर्व शिक्षक- शिक्षिका, प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!