भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

*कोंकण एक्स्प्रेस*

*भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा*

*मालवण : प्रतिनिधी*

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’ सोहळा दि. १५ व १६ ऑगस्ट रोजी करण्यात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वा. झेंडावंदन, सकाळी ८:३० ते ९:३० वा. गोकुळ पूजन व आरती, सकाळी ९:३० नंतर दर्शन, भजन – कनिष्ठ महाविद्यालय आजी – माजी विद्यार्थी, सकाळी ११ वा. फुगडी कनिष्ठ महाविद्यालय मुली, सायं ४:३० वा. भजन (अमोल घाडी- माजी विद्यार्थी), सायं ५:३० ते ६ः३० भजन – सुनिल परुळेकर (माजी विद्यार्थी), शनिवार दि.१६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वा. रस्सीखेच स्पर्धा- कनिष्ठ महाविद्यालय, सकाळी ९:३० ते ११:३० वा. दहीहंडी कार्यक्रम, दुपारी ३ वा. वेशभुषा स्पर्धा १ ली ते ४ थी / ५ वी ते ७ वी, दुपारी ३:३० वा. श्रींची विसर्जन मिरवणूक (वाद्यासह) आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था पदाधिकारी, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि माजी विद्यार्थी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!