*कोकण Express*
*कायद्याचा अभ्यास केल्यास कठीण प्रसंगातूनही निश्चित मार्ग काढता येतो ; अँड निकिता म्हापणकर*
*घे भरारी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती,सिंधुदुर्गच्या वतीनेकर्तुत्वान महिलांचा सत्कार…!*
*महिलांना कायदेविषय मार्गर्शन…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आजची स्त्री केवळ अबला नव्हे रणराघिणी आहे. त्यामुळे ती आपले रक्षण करू शकते. मात्र या जोडीदार कायद्याचा अभ्यास केल्यास कठीण प्रसंगातूनही निश्चित मार्ग काढता येतो.कायद्याचा आधार घेत स्त्रियांनी कायदेविषक मार्गाने न्याय मिळवला पाहिजे. केवळ चूल आणि मूल या मर्यादित कक्षेतून बाहेर पडून अन्याय अत्याचाराविरोधात पुढे आले पाहिजे.आज महिलांच्या हिताचे अनेक कायदे असून वडिलोपार्जित मालमत्ता ही स्त्रियांना समान हक्कदार आहेत याची जाणिव ठेवुन आपण ही कमी नाही हे लक्षात घ्यावे.कायद्याचा उपयोग अन्याया विरोधात आपल्या संवरक्षनासाठी करावा.असा सल्ला कणकवली दिवाणी न्यायालयातील अँड.निकिता म्हापणकर यांनी केले. घे भरारी पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती,सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली अमित मंगल कार्यलयात महिलादिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उदघाटन अँड.निकिता म्हापणकर यांच्या हस्ते सवित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालत दीपप्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी महिला उत्कर्ष समिती जिल्हाध्यक्षा ज्योतिका हरयाण,उपाध्यक्षा अँड स्वाती तेली,सचिव सुप्रिया पाटील,सदस्य नेहा कोळंबकर, श्रद्धा पावसकर स्वरदा खांडेकर दूर्वा मानकर दीपा ताटे शोभा पाष्टे आदी मान्यवर व महिला उपस्थित होत्या.फेब्रुवारी २०२० ला ही समिती स्थापना करण्यात आली.कणकवली,कुडाळ,वैभवाडी आदी तालुक्यातील ७० महिला या समितीत काम करत आहेत.महिला सक्षमीकरण करणे हे उद्धिष्ट असून वेगवेगळ्या पदांवरकाम करणाऱ्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग असून कोणत्याही महिलेच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी या समितीतील सदस्य कामकरणार असून या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमांची माहिती ज्योतिका हरयाण यांनी दिली. तर अँड स्वाती तेली यांनी उपदेशपर मार्गदर्शन केले. शर्मिन काझी (वैभववाडी), निशा गुरव (शेर्पे), सविता भोवड (कणकवली)दीपिका रांबाडे (असलदे)अनुष्का ओरोसकर,सुविधा ठाकूर,स्नेहा शेळके,इशा कदम,आदी कर्तुत्वान महिला,कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य सेविका तसेच काबाड कष्ट करून यशस्वी महिलांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सुप्रिया पाटील यांनी मानले.कोरोना बाबतचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडला.

