*कोंकण एक्सप्रेस*
*फोंडाघाट महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न : वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत उपक्रम*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे ग्रंथ प्रदर्शन करण्यात आले.वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत उपक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले होते.
महाविद्यालयात असे अनेक प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतात.महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाचनाची आवड लागावी, कपाटातील पुस्तके चाळली जावीत. मोबाईलच्या पलीकडे पुस्तकाची वेगळी दुनिया आहे. त्याचे भान मुलांना यावे या अपेक्षाने अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.मुलांना वाचण्याची आवड व गोडी लावली तर मुलं वाचनाकडे निश्चित वळतात.असा आपला अनुभव असल्याचे मत ग्रंथपाल डॉ.विद्या मोदी यांनी व्यक्त केले.खरं म्हणजे पुस्तकाचे वाचन हेच खरे ज्ञान भांडार आहे. पुस्तक वाचली तर मस्तक सुधारतात.मोबाईल मधले वाचन हे चांगले वाचन नसते.पुस्तकातून चांगल्या वाचनाचे अनुभव मिळतात,वास्तव कळते.त्यामुळे मुलांनी वाचले पाहिजे.असे मत प्राचार्य डॉ.पुरंधर नारे यांनी व्यक्त केले.ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

