DLLE ची जिल्हास्तरीय कार्यशाळा खारेपाटण महाविद्यालय येथे संपन्न

DLLE ची जिल्हास्तरीय कार्यशाळा खारेपाटण महाविद्यालय येथे संपन्न

*कोंकण Express*

*DLLE ची जिल्हास्तरीय कार्यशाळा खारेपाटण महाविद्यालय येथे संपन्न*

जिल्ह्यातील खारेपाटण येथील खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, खारेपाटणचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण, येथे मंगळवार दि.१३ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि या या महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय प्रथम सत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश चालू शैक्षणिक वर्षात विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाने आखलेल्या आराखड्याची व त्याची अंमलबजावणी करण्याची तांत्रिक पद्धती याची ओळख करून देण्याचे होते.
या कार्यशाळेमध्ये सण २०२४-२५ मध्ये या विभागा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. ज्या मध्ये अन्नपूर्णा योजना, पॉप्युलेशन एज्युकेशन, पर्यावरण शिक्षण, करियर प्रकल्प, सर्वेक्षण संशोधन, नागरी संवेदना, उद्योग अभिमुक्ता प्रकल्प, ग्राहक संरक्षण मार्गदर्शन, कौशल्य विकास अशा अनेक समाजाभिमुख प्रकलप विषयांचा समावेश आहे. अशा अनेक प्रकल्पाची माहिती व त्यांची अंमलबजावणी करण्या संबंधित प्रा. एस. एन. पाटील, प्रा. मुबंरकर सर, प्रा. यशोधन गवस सर, प्रा. यु. टी. परब, प्रा. अशोक पाटील या सर्व फिल्ड कोऑर्डिनेटर नी सर्व विस्तार कार्य शिक्षक व विद्यार्थी प्रतिनिधी ना मार्गदर्शन केले.
या मध्ये आयोजित कार्यशाळेत जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाच्य आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे सर्व विस्तारकार्य शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी हजर होते,
या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, खारेपाटण पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष प्रवीणजी लोकरे, उपाध्यक्ष रघुवीर राणे, सेक्रेटरी महेशजी कोळसुलकर व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खारेपाटण महाविद्यालयाचे विस्तारकार्य शिक्षक प्रा. गजानन व्हँकळी यांनी केले, तर, मान्यवरांचा परिचय प्रा. रश्मी देसाई यांनी केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. माधवी पांचाळ यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!