कणकवलीत सामूहिक बलात्काराची खळबळ जनक घटना

कणकवलीत सामूहिक बलात्काराची खळबळ जनक घटना

*कोकण Express*

*कणकवलीत सामूहिक बलात्काराची खळबळ जनक घटना*

*प्रियसी बरोबर प्रियकाराने दोन मित्रांसोबत सामूहिक केला बलात्कार*

 *सामूहिक बलात्कार प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पोलीस ठाण्यात एका युवतीवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या २१ वर्षीय युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कणकवली तालुक्यामध्ये १५ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. १५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याची आहे.

या प्रकरणी बाळकृष्ण सदानंद तांबे (२६, नाद देवगड), शैलेश शांताराम तांबे ( दारुम), गणेश प्रकाश गुरव (शिरवली ता. देवगड) या तिघांवर सामूहिक बलात्कार व अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी के. एल. सावत व कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!