*कोकण Express*
*एन.एस.एस.शिबिरातील संस्काराची शिदोरी जपून ठेवा ;श्री. प्रकाश लिंग्रस*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचे २०२२/२३चे एन.एस.एस.विभागाचे विशेष निवासी शिबिर दि.२३/१२ ते २९/१२/२०२२ या कालावधीत फोंडाघाट गांगोवाडी येथे संपन्न झाले. त्याच्या सांगता समारंभासाठी श्री. प्रकाश लिंग्रस हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा निवासी शिबिरांची आवश्यकता असल्याचे सांगितले. शिबिरात विद्यार्थी घडतात स्वयंशिस्त पाळतात. स्वतःचे छोटे छोटे निर्णय घ्यायला शिकतात. सहकार्य करायला शिकतात. मित्र-मैत्रिणींची काळजी घ्यायला शिकतात. श्रमाची किंमत कळते. एकंदरीतच सर्व समावेशक विकास या विद्यार्थ्यांमध्ये घडत असतो. या सात दिवसात मी निरीक्षण करत होतो. विद्यार्थी गुणी आहेत. सांगितलेले संस्कार घडून घेणारे आहेत. समाजाप्रती आत्मीयता आहे. संस्कारीत समाज यातूनच घडनार आहे. यासाठी हे विद्यार्थी पात्र आहेत. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला उपस्थित डॉ.ताडेराव म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या संस्काराची क्षमता सिद्ध केली. श्रम आणि बुद्धी याचा चांगला समन्वय साधून स्वतःचा विकास करण्याची संधी या निवासी शिबिरातून मिळत असते. ती संधी यांनी मिळवली त्यांच्या जीवनात खूप काही बदल घडेल. जन माणसातील प्रतिमा ही फार मोठी शिदोरी असते.
एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांनी शिबिरार्थी तसेच हस्तेपरस्ते ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानले. अगदी शिबिराला आलेल्या दिवसापासून सांगता होईपर्यंत वाडीतील प्रत्येक घटकाने केलेली मदत फार मोलाची आहे. असे सांगून गांगोवाडीतील प्रत्येक व्यक्ती प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शिबिराच्या कार्यकाळात रस्ते सफाई, मंदिर सफाई,वनराई बंधारे, प्राथमिक शाळा स्वच्छता, दुपारच्या सत्रातील बौद्धिक चर्चा तसेच सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
शिबिराच्या ठिकाणी वेळोवेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, महाविद्याचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
सांगता समारंभाला महाविद्याल्याचे प्रभारी प्राचार्य प्रा. जगदीश राणे, रुपेश चव्हाण, संदेश लाड, धनावडे, प्रा. रवींद्र आचरेकर, प्रा. संतोष आखाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

