*कोकण Express*
*भिरवंडे जांभूळभाटले वाडी येथील वृद्धाचा शॉक लागून मृत्यू…!*
*गुरे चारण्यासाठी गेले असता विजेच्या तुटलेल्या तारांना झाला स्पर्श…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यातील भिरवंडे गावातील जांभूळभाटले वाडी येथील सत्यवान नारायण सावंत (वय 78) यांचा विजेच्या प्रवाहित तारेला स्पर्श होत शॉक लागून मृत्यू झाला.ही घटना आज सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सत्यवान सावंत हे नेहमीप्रमाणे आज सकाळी गुरे चारण्यासाठी घेऊन रानात गेले होते. यावेळी विजेच्या तुटलेल्या तारा त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांचा विजेच्या तुटलेल्या तारांना स्पर्श झाला. व त्यांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी येथे चरत असलेल्या गुरांना विजेच्या तारांचा नाजुकसा धक्का गुरांना बसल्याने गुरे तिथून पळाली. यामुळे ती बचावली ही घटना कळताच या परिसरातील नागरिकांनी घटास्थळी धाव घेतली.
