*कोकण Express*
*शाळा कोळोशी हडपीड येथे स्वस्तिक फाऊंडेशनच्या वतीने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड प्रशालेत गुरुपौर्णिमेनिमित्त स्वस्तिक फाऊंडेशनच्यावतीने मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.स्वस्तिक फाऊंडेशन चे अविनाश फाटक, संदेश शेट्ये,भाऊ परब ,अजित कावल तसेच श्री चारूहास इंदप ,अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ ,कोळोशी हडपीड, मुंबई उपस्थित राहून मुलांना शुभाशीर्वाद दिले.चेअरमन किशोर राणे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक प्रमोद लोके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रम सूत्रसंचालन गर्जे मॅडम यांनी तर करडे सर यांनी आभार मानले आहेत. इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यासाठी सहकार्य केले आहे.

