*कोकण Express
*जेष्ट साहित्यिक,प्रतिभावंत लेखक, मालवणी बोली साहित्य संमेलनाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी भोगले.सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने सन्मानित*
हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याचे अवचित्त साधून गाव गाता गजाली फेम चे लेखक ,श्री प्रभाकर जी भोगले यांच्या कळसुली येथें निवास स्थानी जाऊन सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र च्या अध्यक्ष अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी आपल्या महिला कलाकारांसोबत भेट घेत सिंधुरत्न फाऊंडेशन च्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले ,यावेळी श्री भोगले यांनी उपस्थित महिलांना उत्तम मार्गदर्शन केले ,दशावतार ही कला कोकणात कशी आली ,ती का व कशी सादर करावी हे समजून सांगितले , घर संसार समभाळून ,पार्लर व्यवसाय समाजसेवा ,अभिनय ,नाटक हे सर्व सहजपणे समभाळत असणाऱ्या सौ अक्षता कांबळी यांना शाबासकी देत त्यांना कौतुकाची थाप देत आशिर्वाद दिले ,यावेळी सिंधुदुर्ग प्रतिष्ठान चे कार्याध्यक्षआमचे बंधू श्री राजेश राणे हजर होते ,सिंधुरत्न फाऊंडेशन चे सिद्धेश कांबळी ,अनुज कांबळी ,सौ साक्षी आंमडोस्कर ,सुप्रिया पाटील,मानसी कांबळे,शिवानी डीचोलकर,अनिशा राऊळ,सुचिता भोगले उपस्थित होत्या ,यावेळी श्री भोगले यांनी सर्व कलाकार ना आशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या ,आपले आशीर्वाद हे आमच्या साठी सुवर्णयोगच आहेत असं बोलून अक्षता कांबळी यांनी कार्यक्रम ची सांगता केली

