*कोकण Express*
*वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीमधील शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या विकास कामांचा करण्यात आला शुभारंभ*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या हद्दीमधील पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन नगरोत्थान व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वैभववाडी शहरासाठी एक कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या सर्व कामांचा शुभारंभ शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हाप्रमुख नंदू शिंदे व शिवसेनेच्या शहरातील सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज करण्यात आला. यावेळी वार्ड क्रमांक १ मध्ये एम. एस. ई. बी. रस्ता ते बोभाटे यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण तसेच मीनाताई बोडके यांचे घर ते राठोड यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण करणे २८ लाख रुपये, तहसील कार्यालया समोर मिनी हायमास्ट बसवणे १.५ लाख रुपये, वार्ड क्रमांक २ सुख नदी नजीक माईणकरवाडी येथे गणपती विसर्जन घाट बांधणे ५ लाख, वार्ड क्रमांक ५ येथे गटर बांधणे २० लाख, वार्ड क्रमांक ७ येथे शांती नदी नजीक धुण्याचा कट्टा व संरक्षण भिंत बांधणे २८ लाख, वार्ड क्रमांक १०,१२,१३ मध्ये गटर बांधणे प्रत्येकी १२ लाख, वार्ड क्रमांक १५ मध्ये लेंडी व्हाळ येथे गटार बांधणे ५ लाख, वार्ड क्रमांक १५ मिनी हायमास्ट बसवणे १.५ लाख, वार्ड क्रमांक १६ मध्ये तावडेवाडी पाटीलवाडी येथे गटर बांधणे ६ लाख, वार्ड क्रमांक १७ मध्ये कासारव्हाळ राववाडी येथे गणपती विसर्जन घाट सुशोभिकरण करणे ५ लाख.
या सर्व कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, निवृत्त पोलिस अधिकारी संदीप सरवणकर, नगरसेवक श्रद्धा रावराणे, रणजित तावडे, मनोज सावंत, माजी तालुकाप्रमुख अशोक रावराणे, संभाजी रावराणे, माजी सभापती मिनाताई बोडके, सुनील रावराणे, संतोष पवार, शिवाजी राणे, रोहित रावराणे, बाळा इंदप, संतोष माईणकर, अनंत माईणकर, सदानंद माईणकर, प्रकाश माईणकर, आकाश कानडे, अवधूत माईणकर, मधुरा बाणे, मानसी सावंत, शाहु सावंत, पप्पू डांगे, दत्तात्रय बोभाटे, बंड्या होळकर, सुप्रिया इस्वलकर, मारुती गुरव, राजा गजोबार, अमोल पाटील आदी शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

