नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

*कोकण Express*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या कडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन*

 

*छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन*

*नगराध्यक्ष मानधनाची सहा महीन्याची रक्कम पुतळा स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी दिल्याबद्दल मंडळाकडून आभार*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने कणकवलीचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगरसेविका मेघा गांगण, मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, संस्थापक सदस्य आनंद पारकर, भाई परब, प्रीतम म्हापसेकर, आनंद पारकर, कल्याण पारकर, आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणाच्या कामाकरिता नगराध्यक्ष पदाच्या मानधनाची सहा महिन्यांची रक्कम देण्याची जाहीर केल्याबद्दल मंडळाच्यावतीने नगराध्यक्ष श्री नलावडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!