*कोकण Express*
*▪️नागपूर करमाळी नागपूर रेल्वेसेवेला अधिकृत पेण येथे थांबा देण्यासाठी व २० नोव्हेंबर नंतर सुरू ठेवण्याची मुख्य रेल्वे बोर्ड अध्यक्षांकडे केली मागणी*
०१२३९/०१२४०करमाळी नागपूर करमाळी रेल्वेसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून ही रेल्वे सेवा एसटी महामंडळाचा संप पुकारण्यात आल्याने २० नोव्हेंबर नंतर पुढे कायम सुरू ठेवण्यासाठी मुख्य रेल्व बोर्ड अध्यक्षांकडे मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असुन येथे नागपूर जं,वर्धा जं,अमरावती जं,बडनेरा जं,मूर्तीजापूर,अकोला जं,शेगाव,नांदुरा,मलकापूर,मुक्ताईनगर,भुसावळ जं,जळगाव जं,चाळीसगाव जं,पाचोरा जं,मनमाड,नाशिक रोड,इगतपुरी,कसारा परिसरातील अनेक नागरिक,विद्यार्थी,विद्यार्थनी,प्राचार्य कोकणात खाजगी व सरकारी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यामुळे त्यांची सारखी ये-जा सुरू असते ही रेल्वे २० नोव्हेंबर नंतर सुरू ठेवावी या प्रवाशांना नागपूर करमाळी किंवा अमरावती मडगांव अमरावती ही रेल्वेसेवा तर यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना येण्य-जाण्यासाठी फायदा होऊ शकणार आहे तरी ही रेल्वेसेवा कायमस्वरूपीची मंजुरी देण्यात यावे प्रवासी समन्वयकांकडून वारंवार केली जात आहे .
एसटी महामंडळाचा संप पुकारण्यात आल्याने या रेल्वेसवेला अमरावती जं,मूर्तीजापूर,नांदुरा,मलकापूर,मुक्ताईनगर,जळगाव जं,चाळीसगाव जं,पाचोरा जं,मनमाड,इगतपुरी,कसारा,पेण,वीर,कळंबणी,आरवली,सावर्डा,विलवडे,अडवली,राजापूर रोड,खारेपाटण,वैभववाडी अधिकृत थांबे देण्यात यावे त्याची मंजुरीचे पत्र कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई पेण संपर्कप्रमुख व रेल्वे प्रवासी संघटना शेगाव सभासद श्री हर्षद भगत, मंडणगड दापोली संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष वैभव बहुतूले,ठाणे कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी,रेल्वे प्रवासी मित्र सुधीर राठोड,मनोज चव्हाण, गजानन राठोड, याना पाठवून देण्यात यावे .

