*कोकण Express*
*आमदारगणेशभक्तांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस*
* नितेश राणे यांचीं घोषणा*
*7 सप्टेंबर रोजी सकाळी दादरहून सुटणार मोदी एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग*
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल 1 हजार 800 गणेशभक्तांसाठी कोकणातील गावी येण्यासाठी भाजपा आमदार नितेश राणे हे दादरहून स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात नामदार नारायण राणे याना मानाचे स्थान देत केंद्रीय उद्योगमंत्रीपदी संधी देत कोकणला आशीर्वाद दिला. याचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईस्थित आपल्या समस्त कोकणी बांधवांसाठी आमदार नितेश राणे हे स्पेशल मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडणार आहेत. कोकण रेल्वेच्या दादर ते सावंतवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ही ट्रेन धावणार असून एकूण 1 हजार 800 गणेशभक्तांना अगदी मोफत प्रवास या ट्रेनने करता येणार आहे. प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना एक वेळ भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. दादरहून प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून ही ट्रेन सुटणार आहे. आपल्या सीट रिझर्व्ह करण्यासाठी 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत कणकवली भाजपा मंडल तालुकाध्यक्ष संतोष कानडे मोबा. 9422381996, मिलिंद मेस्त्री मोबा. 9420654565 वैभववाडी भाजपा मंडल तालुकाध्यक्ष नासिर काझी मोबा. 9422392855, देवगड भाजपा मंडल तालुकाध्यक्ष डॉ.अमोल तेली मोबा. 7620947676, संतोष किंजवडेकर मोबा. 8975802748 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
गणेशभक्तांना बाप्पा पावला
गणेशचतुर्थी म्हटलं की समस्त चाकरमान्यांना आपल्या कोकणातील गावचे वेध लागतात. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्याच लाटेमुळे अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी येणे शक्य झाले नाही. काहींच्या घरी तर गणेशमूर्तीही येऊ शकल्या नाही. यावर्षी सिंधुदुर्गात कोरोना आटोक्यात आहे. त्यामुळे चाकरमानी मोठया संख्येने गणेशचतुर्थीला सिंधुदुर्गात आपल्या घरी येण्यासाठी आतुररलेले आहेत. मात्र गावी येण्यासाठी काहींना वाहनांची सोय उपलब्ध होत नाही.वाहतुक सुविधा असलीच तर तिकीट बुकिंग साठी चढ्या भावाने हजारो रुपये मोजावे लागतात. आधीच कोरोनामुळे कामधंदा बुडालेला चाकरमानी गावी गणपतीला येण्याची तीव्र इच्छा असूनही अव्वाच्या सव्वा असणाऱ्या वाहतूक खर्चामुळे मेटाकुटीला येतो. या अवस्थेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी सर्वसामान्य गणेशभक्तांचा विचार करून मोदी एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस ट्रेनमुळे कोकणात गावी जाण्यासाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांमध्ये गणपती बाप्पाच पावल्याची भावना आहे.

