मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
कुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिरदुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देशपावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावाहरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हातभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्गनागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शनशाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारकुडाळ-कणकवलीत मोफत आरोग्य तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबिरदुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देशपावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावाहरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’रविंद्र चव्हाण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांना आधाराचा हातभाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘एक मदतीचा हात’जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्या शासकीय निवासस्थानी बाप्पाचे दर्शन - आ. निलेश राणे सिंधुदुर्गनागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध सुविधांबाबत मार्गदर्शनशाळा, शिक्षण वाचविण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनसिंधुदुर्ग राजाच्या आशीर्वादाने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा

📅 २२ सप्टेंबर, २०२६👁 १०ब्रेकिंग
पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा

*कोंकण एक्सप्रेस

*पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा

*बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही भागात भातपीक करपण्याच्या घटना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत भातपिकाच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपलब्ध निधीचा प्रभावी व वेळेत विनियोग करण्यासोबतच विकासकामांची गुणवत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, यावरही बैठकीत चर्चा झाली. दर आठवड्याला अमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

सिंधुदुर्ग मधील अधिक बातम्या

अधिक पहा →