बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२६
कोंकण एक्सप्रेस
ब्रेकिंग
• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश• वर्सोवा कोळीवाड्यात मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांसोबत साजरी केली दिवाळी• विशालभाई परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!• दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण; तुळशीविवाहापर्यंत दर्शनाची संधी• *कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १४ नोव्हेंबरला मणक्याच्या आजारांची मोफत तपासणी शिबिर• तळेरेतील वाघाचीवाडीत बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाची रात्रगस्त सुरू• भाजपा पदवीधर सेल, दक्षिण रत्नागिरी प्रस्तुत "स्वर दीपावली" मैफिलीचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उद्घाटन• पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन• जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलची चमक• दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त• किंजवडे ठाकूरवाडी शाळेत पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’

📅 २२ सप्टेंबर, २०२६👁 १९ब्रेकिंग#झी मराठी
हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’

*कोंकण एक्स्प्रेस

*हरकुळ बुद्रुकमध्ये रंगला ‘झी मराठी चा जल्लोष’

*सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती

*महिलांसाठी रंगला खेळ झी मराठीचा

*कणकवली - प्रतिनिधी

तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावात आईनतळवाडी, भवानी मंदिर परिसरात ‘झी मराठी’ चा मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या निमंत्रणातून आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिसरातील रसिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

‘आवडलंय तेच निवडायचं ठरलंय, प्रेक्षकांना जमलंय!’ या उत्साहपूर्ण वातावरणात झी मराठीवरील आपल्या लोकप्रिय कलाकारांना निवडायची संधी ही हरकुळ बुद्रुक गावातील महिलांना लाभली. या मिळालेल्या संधीमुळे महिला, युवक तसेच कुटुंबांसह आलेल्या रसिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

यावेळी प्रथमतः सिने अभिनेते मयुरेश अभ्यंकर व त्यांच्या सोबत आलेल्या संपूर्ण झी मराठी टीम चे हरकुळ वासियांनी स्वागत केले. झी मराठीवर दिसणाऱ्या आपल्या आवडत्या कलाकारांन विषयी महिलांना प्रश्न विचारण्यात आले व विविध गेम देखील खेळण्यात आले. यामध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना झी मराठी परिवाराकडून भेटवस्तू देखील देण्यात आली. मोफत प्रवेशामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली आणि भवानी मंदिर परिसर अक्षरशः रसिकांच्या उपस्थितीने फुलून गेला.

कोकणातील ग्रामीण भागात अशा प्रकारचा मनोरंजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. ‘झी मराठी’च्या कलाकारांची मांदियाळी आणि रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हरकुळ बुद्रुकमध्ये रंगलेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.

यावेळी रोटरी क्लब चे डॉ. अमेय मराठे, वर्षा बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत परब, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, नारकर गुरुजी गावातील ग्रामस्थ सुधीर खोचरे, लक्ष्मण खोचरे, बाबुराव खोचरे, बुवा सुधाकर परब, बुवा राजू खोचरे आदी गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा · Share
जाहिरातजाहिरात

कणकवली मधील अधिक बातम्या

अधिक पहा →