जि प अध्यक्षा संजना सावंत स्वखर्चाने तात्पुरता साकव उभारणार

जि प अध्यक्षा संजना सावंत स्वखर्चाने तात्पुरता साकव उभारणार

*कोकण Express*

*मल्हार पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होऊन आणि पिलर मजबूत असतील तर भाजप घेणार पुढाकार*

*जि प अध्यक्षा संजना सावंत स्वखर्चाने तात्पुरता साकव उभारणार*

*अधिकाऱ्यांची सांगवेत घेतली तातडीची बैठक*

*कणकवली ः संंजना हळदिवे* 

जि प अध्यक्षा संजना सावंत यांनी तुटलेल्या मल्हार पुलावर तात्पुरता साकव उभारून दुचाकी आणि रिक्षा वाहतूक सुरू करण्यासंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सांगवे ग्रा.पं कार्यालयात आज सकाळी घेतली. नाटळ, नरडवे, दिगवळे, दारीस्ते आदी भागांतील नागरिक आणि विद्यार्थ्यांना दैनंदीन कामकाजासाठी कनेडीत यावे लागते. मल्हार पूल कोसळल्यामुळे या गावांचा संपर्क तुटलेला आहे. मल्हार पूल कोसळला त्यावेळी घटनास्थळी आमदार नितेश राणे, जि प अध्यक्षा संजना सावंत, माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता शेवाळे यांच्यासह पाहणी केली होती. त्यावेळी पाहणीदरम्यान पूल कोसळलेल्या ठिकाणी दुतर्फा तात्पुरता लोखंडी साकव उभारता येईल काय याबाबत कार्य.अभियंता शेवाळे यांच्याशी चर्चा केली होती.चर्चेदरम्यान शेवाळे यांनी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे पुलाच्या पिलर च्या मजबुतीबाबत शाश्वती देता येत नसल्याचे सांगितले होते. तसेच कायमस्वरूपी पूल उभारेपर्यंत तात्पुरत्या साकवासाठी शासकीय निधी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. जर पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आणि पिलर मजबूत असतील तर भाजपा पदाधिकारी स्वखर्चाने तात्पुरता साकव नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यास तयार असल्याचे आजच्या बैठकीत जि. प.अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले. आजच्या बैठकीला पिडब्ल्यूडी चे कार्य अभियंता, लघु पाटबंधारे चे अभियंता, विजवीतरण चे अभियंता, एसटी अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!