पुणे-बेंगलोर हायवे पाण्याखाली

पुणे-बेंगलोर हायवे पाण्याखाली

*कोकण  Express*

*पुणे-बेंगलोर हायवे पाण्याखाली* 

*कोल्हापूर:*

शिरोली पुलाची येथे राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्याने रस्ता पाण्याखाली गेला. पोलिस प्रशासनाने खबरदारी घेत पुणे कडे जाणारी वाहतूक बंद केली आहे. NH4 (पुणे – बेंगलोर हायवे) वर पुराचे पाणी वाढत असून रस्त्यावर एक ते दीड फूट पाणी आहे. सध्या NH4 वर एकेरी वाहतूक सुरू आहे. पण पावसाचा जोर पाहता संध्याकाळपर्यंत हायवे बंद होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने खबरदारी घेत रस्ता बंद केला आहे.

कोल्हापूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग हायवेच्या बाजूने लागलेली आहे. अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!