*कोकण Express*
*भाजपच्यावतीने मालवणात जल्लोष…*
*नारायण राणे आगे बढो… च्या घोषणांनी परिसर दणाणला…*
*मालवण ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर आज सायंकाळी शहरात भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. भाजपा कार्यालय, भरड नाका, देऊळवाडा येथे फटाक्यांची आतषबाजी करत नारायण राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणेंनी शपथ घेताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपा कार्यालयातही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, पूजा करलकर, विजय केनवडेकर, बाबा परब, बबलू राऊत, भाऊ सामंत, राजू आंबेरकर, विक्रांत नाईक, भाई मांजरेकर, अभय कदम, बाळा भोगले यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले हा सिंधुदुर्गसाठीच नाही तर संपूर्ण कोकणासाठी भाग्याचा दिवस आहे. विकास काय असतो हे कोकणवासीयांना श्री. राणेंनी दाखवून दिले आहे. त्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे. सिंधुदुर्गला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील. राणे हे जिल्हावासीयांचे दैवत आहेत. आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासाचे दालन खुले होणार आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वास भाजपाचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी यावेळी व्यक्त केला.