*कोकण Express*
*ठाकरे सरकार तालिबानी पद्धतीचा कणकवली भाजपकडून जाहीर निषेध*
*लोकशाहीची नीतीमुल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा केला निषेध*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाहीची नीतीमुल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो. परंतु लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुटया सरकारने घेतला आहे. जनतेचे कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे अशी मागणी कणकवली तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, माजी सभापती दिलीप तळेकर, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, सोनू सावंत, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक मेघा गांगण, शिशिर परुळेकर, परशुराम झगडे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोनू सावंत, स्वप्निल चिंदरकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, विजय चिंदरकर, संतोष पुजारे, बाळा पाटील, समर्थ राणे, प्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
