अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस अटक

अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस अटक

 *कोकण Express*

 *अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस अटक..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी कुंदन राजेश चिंदरकर ( २३ , रा. कलमठ, कुंभारवाडी ) याच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीस राहत्या घरातून अटक ही करण्यात आली आहे.

संशयित आरोपीने संबंधित पीडित युवतीच्या आंगावर धावत जाऊन गळा दाबून शिवीगाळ केली तसेच त्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणी मंगळवारी कणकवली पोलीस ठाण्यात पीडित युवतीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी चिंदरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!