शिवसेनेच्या वर्धापन दिनात ही “नौटंकी” कशासाठी

शिवसेनेच्या वर्धापन दिनात ही “नौटंकी” कशासाठी

*कोकण Express*

*शिवसेनेच्या वर्धापन दिनात ही “नौटंकी” कशासाठी..?*

*वैभव नाईकांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…*

* भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी* 

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवसेनेच्या वर्धापनदिनी कुडाळ मध्ये घडलेला प्रकार हा आमदार वैभव नाईकांना भूषणावह नाही.पोलिसांना धक्काबुक्की करण्यासोबत चुकीच्या पद्धतीने गर्दी जमविणाऱ्या आमदार नाईक यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करावेत,अन्यथा भाजप गप्प बसणार नाही,असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला आहे.
दरम्यान द्यायचे होते,तर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोफत पेट्रोल वाटप करायला पाहिजे होते.त्या ठिकाणी दुस-याच्या पेट्रोलपंपवर गर्दी जमवून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले. असाही सवाल श्री तेली यांनी उपस्थित केला आहे. आजच्या प्रकारानंतर तेली यांनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. व झालेल्या प्रकाराबाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करा,अशी मागणी केली.याबाबत प्रतिक्रिया दिली.झालेला हा प्रकार चुकीचा आहे. आणि संबंधितावर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. कोविड सेंटरसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते.त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार केला.मात्र या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय का? असाही प्रश्न श्री तेली यांनी केला आहे.याबाबत तात्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करा,अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!