*कोकण Express*
*धालवली येथील जिओ टॉवर चालू करण्या साठी स्थानिक आमदार नितेश राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी लक्ष द्यावेत…*
*माजी कोर्ले उपसरपंच सचिन कोर्लेकर यांची मागणी*
*कोर्ले/धालवली*
मागील दोन वर्षा पासून धालवली ता. देवगड येथील उभा असलेला जिओ टॉवर अद्याप कार्यान्वित नसल्याने कुणकवन कोर्ले धालवली पोंभुर्ले या गावचे विद्यार्थी शिक्षक आणि रहिवासी मोबाईल रेंजच्या प्रतीक्षेत आहेत. उपरोक्त संबंधित गावांतील विदयार्थ्यांसह सर्वांनाच नेटवर्क साठी १३-१४ किलोमीटरवर असणाऱ्या खारेपाटण या ठिकाणी यावे लागते. सध्या जवळ जवळ सर्वच कामे ही मोबाईल लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वरून केली जातात आणि संपर्क सुद्धा तातडीने होतो. येथील जिओ टॉवर चालू झाल्यास विद्यार्थी आणि सर्व रहिवासी यांचा मोबाईल संपर्काचा प्रश्न सुटेल, तरी यासाठी या विभागाचे कार्यतत्पर आमदार मा.नितेशजी राणे आणि त्याचप्रमाणे खासदार विनायकजी राऊत यांनी लक्ष घालवेत अशी मागणी माजी कोर्ले उपसरपंच सचिन कोर्लेकर यांनी केली आहे.
