कणकवली भाजपा शाखेची स्तुत्य कामगिरी

कणकवली भाजपा शाखेची स्तुत्य कामगिरी

*कोकण Express*

*कणकवली भाजपा शाखेची स्तुत्य कामगिरी…!*

*कातकरी समाजाला ताडपत्र्यांचे केले वाटप*

*कणकवली ः ( संजना हळदिवे)*

तौक्ती चक्रीवादळाने अनेकांचं घर उध्वस्थ केलं. अनेकांची फळास आलेली बागायत धुळीस मिळवली. त्यानंतर नुकसानग्रस्तांना समाजातून अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. परंतु प्रस्थापित समाजापासून वेगळं राहणाऱ्या भटक्या जमातीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही. कणकवली येथील झोपडपट्टी बांधून जगणारा कातकरी समाजही असाच उपेक्षित राहिलेला. परंतु यांची दखल घेऊन कणकवली भाजपा शाखेतर्फे या कातकरी समाजाला ताडपत्रींचे वाटप करण्यात आले. त्यामुळे कातकरी समाजाचा चेहरा समाधानाने फुलला आहे.

यावेळी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पं. स. सभापती मनोज रावराणे, कणकवली भाजपा शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक किशोर राणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा शक्ती केंद्रप्रमुख महेश सावंत, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस पप्पू पुजारे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश तळगावकर, स्वप्नील चिंदरकर, सचिन बांदिवडेकर, बाळा पाटील, अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!