*कोकण Express*
*आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार…*
तालुका आरोग्य विभागाचे आधारवड आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांना कोरोना योद्धा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुचडे यांनी गेल्या दीड वर्षाच्या काळात कणकवली तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेत अतिउत्कृष्ट असे काम केले असून, रात्री-अपरात्री देखील कोरोना काळात त्यांनी केलेली सेवा गौरवास्पद आहे. बुचडे खऱ्या अर्थाने तालुका आरोग्य विभागाचे आधारवड असून, त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य, लाईव्ह संवाद व निर्मिती विचार मंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुचडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र देत बुचडे यांचा गौरव करण्यात आला असून, त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

