कणकवली शहरातील गटारे नालेसफाई पूर्ण करणार-समीर नलावडे

कणकवली शहरातील गटारे नालेसफाई पूर्ण करणार-समीर नलावडे

*कोकण Express*

*कणकवली शहरातील गटारे नालेसफाई पूर्ण करणार-समीर नलावडे…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पावसाळ्याच्या तोंडावर कणकवली शहरातील गटारांची साफसफाई करणे व साचलेली गटारे, नाले मोकळे करणे ही कामे तातडीने मार्गी लावा. शहरातील काही गटारांची साफसफाई ची कामे झाली असून, उर्वरित कामे येत्या चार दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या. कणकवली नगरपंचायत ची सर्वसाधारण बैठक ऑनलाईन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या बैठकीत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधुत तावडे, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, गटनेते संजय कामतेकर, सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर, कविता राणे, सुप्रिया नलावडे, रवींद्र गायकवाड, अबीद नाईक, शिशिर परुळेकर, मेघा सावंत, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, उर्वी जाधव आदी सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने कणकवली नगरपंचायत ने सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरचा लाभ कणकवली शहरातील रुग्णांना होत असल्याने या नगराध्यक्षांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाबद्दल नगरसेवक अभिजित मुसळे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला.

त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक अबिद नाईक यांनी अनुमोदन दिले. कणकवली नगरपंचायत ने कोविड रुग्णांना चांगल्या सोयी देत येथून अनेक रुग्ण उपचार घेत घरी परतल्याने शहरवासी यांतून या उपक्रमाचे समाधान होत असल्याचे अभिजित मुसळे यांनी सांगितले. शहरातील आतापर्यंत 33 नागरिकांचा कोविड मुळे मृत्यू झाला असून या सर्व नागरिकांना सर्व नगरसेवकांच्या वतीने श्रद्धांजली चा प्रस्ताव नगरसेवक कन्हैया पारकर यांनी मांडला. कणकवली शहरात पावसाळ्याच्या तोंडावर सर्व गटारे व नाले साफसफाई तातडीने हाती घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले. या कामामध्ये पटवर्धन चौक ते आचरा रोड, हॉटेल हॉर्नबिल ते पटकी देवी, फातीमाचाळ, नाथ पै नगर , दत्तमंदिर, सोनगेवाडी ते पराष्ट्येकर घर, ही कामे पूर्ण झाल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. तर सना कॉम्पलेक्स ते एसटी गॅरेज, महापुरुष कॉम्प्लेक्स बाजारपेठ, आरोलकर घर ते सांडव घर हर्णेआळी, तेली आळी उपरकर घर ते तेंडुलकर घर, मराठा मंडळ रोड, बिजलीनगर, एसटी वर्कशॉप गणपती मंदिर वीज वितरण ते सुशांत नाईक घराच्या पाठीमागे, पटकी देवी ते जुना नरडवे रोड, शिवाजीनगर ते उमेश वाळके घर, डॉक्टर नाडर ते विष्णू अपारमेंट कामतसृष्टी, दत्तमंदिर ते रेल्वे स्टेशन क्वार्टर्स ते नाथ पै नगर,बांधकरवाडी ते शिवशक्ती हॉल, काजरेकर हॉल ते कुडतरकर घर, साईनगर वरचीवाडी, बौद्धवाडी, भालचंद्र महाराज मठ रोड ते बेळेकर घर, टकले हॉटेल ते सुकी बिल्डिंग, डेगवेकर मिल ते हॉर्नबिल हॉटेल, मंजुनाथ हॉटेल ते छत्रालया पर्यंत, मारुती मंदिर टेंबवाडी गार्डन ते मुसळे घर, गणपति साना रोड, नगरपंचायत रोड, कॉलेज रोड, हर्णे आळी येथे अबिद नाईक घर ते संजीवनी हॉस्पिटल , भुमिअभिलेख ते दळवी वकील घरापर्यंत, शाळा नंबर 2 ते अमर पवार घर, नागवे रोड स्वयंभू मंदिरापर्यंत, परब वाडी ते शिवाजीनगर, कामात सृष्टी जवळील जुने गटार, परबवाडी टॉवर ते रेल्वे स्टेशन कॉटर्स, फौजदार वाडी आरोलकर फार्म हाऊस पर्यंत, हॉटेल एम एच ०७ ते उचले बिल्डिंग, नाथ पै नगर नाला, मसूरकर किनई ते चर्च हायवे पर्यंत ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच या बाबत नियमित दररोज आढावा घेण्यात येणार असून, या मध्ये येणारे पारंपारिक नाले देखील सफाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. या बैठकीत नगरसेवक सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायत च्या होणाऱ्या ऑनलाईन बैठकींना पत्रकारांनाही समाविष्ट करून घ्या अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!