*कोकण Express*
*पक्षातील सर्व आमदारांच्या माध्यमातून शंभर व्हेंटीलेटर बेड देणार…*
*भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोरोनाच्या काळात आणि त्यानंतर सुध्दा जिल्ह्यातील जनतेला सोईचे व्हावे, यासाठी भाजपाच्या माध्यमातून ऑक्सिजन बँक उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे, अशी माहीती माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.
दरम्यान भाजपाच्या सर्व आमदारांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर व्हेंटीलेटर बेड तीनही मतदार संघात देण्यात येणार आहेत.त्यासाठी जागा सुचविण्यात यावी ,अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटर वाटप करण्यात आले.यावेळी श्री तेली यांनी ही माहीती दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटीलेटर मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून प्रत्येक पालिकेला आत्ता पाच आणि त्यानंतर पाच असे कॉन्सन्ट्रेटर देण्यात येणार आहे.त्यामुळे कोरोना संंपला तरी भविष्यात या ठिकाणी ऑक्सिजनची बँक तयार करू, असे त्यांनी म्हटले आहे.

