देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन*

*मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट दुपारी १.३० वाजता l करण्यात येणार आहे.
देवगड शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या नव्या गुरांच्या कोंडवाड्यामुळे मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला तालुक्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन देवगड भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ आणि शहर अध्यक्ष वैभव करंगुटकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!